ठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवीन कळवा पुलाची ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. 

नवीन कळवा पुलाची ही लेन खुली झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कळवा खाडीवरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला होता.

कळवा नवीन खाडी पुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर रोजी झाले. यांनतर पुलावरील पोलीस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

या लोकापर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे कारागृहाजवळील मार्गिका १ डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणेच हि मार्गिका एक दिवस पूर्वीच म्हणजेच दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त बांगर यांनी केली आहे. या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कळवा चौक आणि बेलापूर रोडकडे जाण्यासाठी ठाणे कारागृहाच्या बाजूने जाणारा मार्ग वापरता येतो. हा मार्ग वाहनांसाठी खुला झाल्यानंतर कळव्यातील ठाणे बाळूकडील चौक आणि शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या