ठाण्यातील लाकूड गोडाऊनला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ताज्या वृत्तानुसार, मंगळवार, २६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका लाकूड गोदामाला भीषण आग लागली. आगीत गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की भिवंडी शहरातील रहनाल गावातील शाळेजवळ असलेल्या गोदामात पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली, असे ठाणे महानगरपालिकेचे (TMC) प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून चार तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत, अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच )


पुढील बातमी
इतर बातम्या