स्टेशनच्या भिंती पुन्हा पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मेकिंग ए-डिफरन्स आणि मुंबई फर्स्ट (मॅड) यांच्या संयुक्त विद्यमाने 'हमारी स्टेशन, हमारी शान' हा उपक्रम घाटकोपर स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आला होता. यावेळी स्टेशनवरील भिंती रंगवून सुंदर चित्रे देखील काढण्यात आली होती. 

मात्र आता पुन्हा या भिंतीवर लोकांनी पानाच्या पिचकाऱ्या थुकूंन रंगवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सुंदर सजवलेल्या भिंती पुन्हा एकदा घाणेरड्या झाल्या आहेत.

काही महिन्यापूर्वीच घाटकोपर स्टेशनमध्ये 'हमारी स्टेशन, हमारी शान' हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रम दानातून स्टेशनवर सामाजिक, देशभक्ती, पर्यावरण, शैक्षणिक, पाणी वाचवा आणि बेटी बचाव असे संदेश देणारी चित्रे देखील काढण्यात आली होती. मात्र पुन्हा अशा घाणीमुळे या सगळ्यावर पाणी पडलंय.
दरम्यान सामाजिक गोष्टींचे रक्षण करणे, ही जशी सरकारची जबाबदारी तशीच नागरिकांची देखील असल्याचं मत सविता थोरात यांनी व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या