नॅशनल पार्कमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्कमधील अनधिकृत झोपड्यांवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली. वनविभागाने केलेल्या या कारवाईचा शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी तीव्र शब्दात विरोध करत नवीन झोपड्या बनत होत्या तेव्हा वनविभागाचे अधिकारी काय करत होते? असा सवाल उपस्थित केला आहे.

या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा दिली असतानाही हे रहिवासी ती जागा भाड्याने देऊन येथेचे वास्तव करत असल्याने ही कारवाई केल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल पार्कच्या आतील परिसरात काही गावं आहेत. ज्यामध्ये आदिवासी लोकं अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. कोर्टाने या भागात राहणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर करा असे आदेश दिले होते. या आदेशानुसार 1994 सालाच्या आधीपासून वास्तव्य करणाऱ्या लोकांना अंधेरीच्या चांदीवली परिसरात स्थलांतरीत देखील करण्यात आले. मात्र हे रहिवासी तिथे न जाता इथेच वास्तव्य करत असल्याने अखेर वन विभागाने ही कारवाई केली.

पुढील बातमी
इतर बातम्या