मीरा-भाईंदर शहरात ‘मेट्रो-9’ (metro) चा पहिला टप्पा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच रस्त्यांच्या कामासाठी 1200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने (maharashtra) मंजूर केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत शहराच्या वाहतूक कोंडीपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंतच्या 25 विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत चेना रिव्हर वॉटर फ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा विकास, नवीन पालिका इमारत, 51 फुटी विठ्ठल मूर्ती (जरीमरी तलाव), क्लस्टर योजना, आरोग्य सेवा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या 50 कोटी निधीमार्फत महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शहरात भव्य ‘उमेद’ मॉल उभारण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत.
शहरात महिला हॉस्टेलसाठी 50 कोटींचा निधी राज्य शासनाकडून मजूर करून लवकरच त्यासाठी जागा निश्चीत केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या माध्यमातून आधीच मीरा-भाईंदर शहराच्या विकास कामांकरिता 1400 कोटी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 900 कोटी एकूण 2300 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
आता रस्ते काँक्रिटीकरणासाठी अतिरिक्त 1200 कोटींचा निधी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे आणि लवकरच याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
या 1200 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे.
येत्या दीड ते दोन वर्षात संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी व्यक्त केला.
बीओटी तत्त्वावर संपूर्ण मीरा-भाईंदर शहर मोफत वाय-फाय सुविधेने सज्ज होणार आहे. यासाठी येत्या 2-3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
पालिका प्रशासनाच्या कामात गती आणण्यासाठी दर महिन्याला आयुक्त स्तरावर आढावा बैठक घेतली जाईल, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
हेही वाचा