मुंबईतील (mumbai) भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरणावर भर देण्यात आला आहे.
जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत तब्बल 25 हजार 980 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (bmc) देवनार पशुवधगृहाकडून देण्यात आली.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांसह (stray dogs) मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. वर्षभरात 11 हजार 725 मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे विभागाने सांगितले.
मुंबईत जवळपास 95 हजार भटके कुत्रे आहेत. गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांचा चावा घेतला आहे.
मुंबई शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यापैकी एक म्हणजे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत वर्षभरात 25 हजार 980 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांसह मांजरींचाही उपद्रव वाढला आहे.
मांजरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभरात 11 हजार 725 मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे.
यामुळेच जगभरात दरवर्षी हजारो लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे (rabies) जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
भटक्या कुत्र्यांना ठराविक ठिकाणी अन्न देण्यासाठी शहरात 18 अधिकृत फिडिंग स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत.
हेही वाचा