दहिसरमध्ये फ्लॅटचं छत कोसळलं, पण पालिकेनं...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसर इथल्या संजीवनी सोसायटीमध्ये सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. त्यानंतर पालिकेनं ही इमारत खाली करण्यास सांगितलं आहे. त्याबरोबरच पालिकेनं इमारतीच्या आसपासची काही घरं खाली करण्यास सांगितलं आहे.

या दुर्घटनेत दोन रहिवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला जखम झाली आहे. रहिवाशांचं म्हणणं आहे की, इमारत मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचाव कार्यास सुरुवात केली.

रहिवाशांचं म्हणणं आहे की, अनेकदा मालकाकडे आम्ही इमारतीच्या कमकुवत ढाच्यासंदर्भात तक्रार केली आहे. पण आमच्याकडे तक्रारीकडे नेहमी मालकानं दुर्लक्ष केलं. इमारतीची अवस्था प्रचंड वाईट आहे. पण पालिका आणि मालकामुळे लोकांना याच इमारतीत राहावं लागत आहे.

पालिकेनं इमारत खाली करण्याची नोटीस इथल्या रहिवाशांना दिली आहे. पण आता इथल्या रहिवाशांपुढे ही जागा सोडून दुसऱ्या जागी कुठे जायचं हा प्रश्न पडला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या