महाराष्ट्रातील 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
शिक्षण विभागात नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. असे असताना राज्यातील (maharashtra) ग्रामीण भागांमध्ये शाळांची (schools) परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र आहे.
‘यूडायस-प्लस’वरील 30 सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणींतील 394 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे.
सुमारे आठ हजार शाळांची पटसंख्या दहाच्याही खाली आहे. राज्यात एकूण दोन कोटी 11 लाख 86 हजार 943 विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे.
मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या (students) लाखोंनी वाढेल असे असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.

‘यूडायस-प्लस’वरील नोंदणीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक 37 शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही.

रत्नागिरीतील 24, नागपूरमधील 23 शाळाही विद्यार्थ्यांविना आहेत. बुलढाण्यात 21 शाळांत शून्य पटसंख्या आहे.

या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 713 शाळांची पटसंख्या 10च्या खाली आहे. तसेच पुण्यात 627, रायगडमध्ये 682, तर सिंधुदुर्गमध्ये 569 शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.

मुंबई (mumbai) उपनगरांतील 360, मुंबई शहरातील 34, ठाण्यातील (thane) 199 आणि पालघरमधील 124 शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या 10च्या खालीच आहे.

उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 200 ते 300, तर काही ठिकाणी 100 ते 150 शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार 946 शाळांत केवळ 1 ते 10 विद्यार्थी नोंदले गेले आहेत.


हेही वाचा

आता ठाण्याहून भाईंदर अवघ्या 20 मिनिटात

मुंबईत दसऱ्यानिमित्त पोलिस कर्मचारी तैनात

पुढील बातमी
इतर बातम्या