दिलासादायक! मुंबईत तूर्त लॉकडाऊन नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दररोजच्या चाचण्यांचं प्रमाण २३ हजारांपर्यंत वाढल्यानं दैनंदिन रुग्ण नोंद वाढली आहे. मुंबईत स्थिती नियंत्रणात असल्यामुळं तूर्तास तरी लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

लोकलसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. वारंवार सूचना करूनही लोक मास्क लावत नाही. त्यामुळं मुंबईकरांनी खबरदारीचे नियम न पाळल्यास तसंच, यापुढंही रुग्णवाढ अशीच कायम राहिल्यास लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असा इशाराही महापालिका प्रशासनानं दिला आहे. मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रुग्णवाढ दिसत असली तरी चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ५ टक्के घट आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असा पुनरुच्चार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या