मुंबईत पाणीकपात होणार नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 11.76 टक्के पाणी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यादरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज्य सरकारने अप्पर वैतरणामधून पाण्याचा कोटा देण्याचे मान्य केले. त्यामुळे आता मुंबईत पाणीकपातीची शक्यता नगण्य झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 11.76 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याची टांगती तलवार लक्षात घेऊन राज्य सरकारने कोट्यातील अप्पर वैतरणा येथून मुंबईकरांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून राज्य सरकारने अप्पर वैतरणामधून पाण्याचा कोटा देण्याचे मान्य केले आहे.

अप्पर वैतरणामधून पाण्याचा कोटा देण्यासाठी बीएमसीने राज्य सरकारला पत्रही लिहिले होते. ज्यावर बराच काळ निर्णय होत नव्हत. मात्र, आता राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.


हेही वाचा

मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या