गणेशोत्सव २०१९: यंदा बाप्पाच्या मूर्तीची होणारी विटंबना टळणार का?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
दरवर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला समुद्र किनारी राहिलेल्या दिसतात. त्याशिवाय ११ दिवस त्रिकाळ पूजा होणारी बाप्पाची मूर्ती तुकड्यांमध्ये विखरलेली पाहायला मिळते. त्यामुळं पर्यावरणाची हानी होऊन, मूर्तीची विटंबनाही होते. त्यामुळंं यंदा घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांकडून शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला आहे. विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीची विटंबना होऊ नये आणि पर्यावरणाचंही संवर्धन व्हावे यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यास गणेश भक्तांनी प्राधान्य दिलं आहे.

दरम्यान, बाप्पाच्या मूर्तीची विटंंबना होऊ नये म्हणून इकोफ्रेंडली मूर्ती घरोघरी आणली जाते. बुध्द‌िची देवता विघ्नहर्त्या गणरायाचं २ सप्टेंबरला घरोघरी आगमन होणार आहे. पारंपरिक पध्दतीनं घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या