घाटकोपरमध्ये कामगार रासायनिक टाकीत गुदमरले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील एका रासायनिक कंपनीत टाकी साफ करताना ३ कामगार गुदमरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. घाटकोपर परिसरात सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. या ३ कामगारांपैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत ३ कामगार रासायनिक टाकी साफ करत होते. त्यावेळी विषारी वायू नाकातोंडात जाऊन हे कामगार गुदमरले. यापैकी रामनिगोर सरोज या कामगाराचा तात्काळ मृत्यू झाला. 

रुबीन डिंगकर (३५) आणि श्रावण सोनावणे (२५) या २ कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या