मोहरम काळात मानखुर्दमधील वाहतूक मार्गात बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मोहरमनिमित्त मानखुर्द विभागामध्ये 1 ते 2 ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत प्रवेश बंद असणार आहे. या काळात प्रवाशांना पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

पर्यायी मार्ग

घाटकोपर, विक्रोळीहून येणाऱ्या आणि मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांना उमरशी बप्पा जंक्शन व्ही. एन. पुरव या मार्गाचा वापर करता येणार आहे. या काळात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोड, मधुकर कदम मार्ग, पी. एल. लोखंडे मार्ग या मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या