पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. एकीकडे मेट्रोसाठी वृक्षांची कत्तल सुरू झाली असतानाच दादरनंतर आता वडाळा स्टेशन रोड येथे टॅक्सीवर झाड कोसळून अपघाताची घटना सोमवारी सकाळी घडली.
या अपघातात कुठलीही जीवितहानी जरी झाली नसली, तरी पावसाळ्यात झाडे कोसळून होणाऱ्या अशा अपघातांची दखल घेऊन पालिका किती तत्परता दाखवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.