मलबार हिलजवळील समुद्रात बुडून २ मुलांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील मलबार हिल इथं २ मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत अद्याप स्पष्टता नसून, पोलिस याबाबत तपास करत आहेत. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि शोध सुरु केला. 

सोमवारी संध्याकाळी ही मुलं आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मुंबईला नागपाडा इथं राहणारी मुलं आपल्या मित्रांसोबत प्रियदर्शनी पार्क इथं गेली होती. १४ ते १५ वयोगटातील या मुलांसोबत त्यांचे ३ मित्र होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी पार्क इथं गेल्यानंतर मुलं समुद्रात उतरली होती. तिथे कोणतंही बॅरिकेड नसल्यानं मुलं सहज गेली आणि पाण्यात खेळू लागली अशी माहिती मिळते. दोन्ही मुलं बुडू लागल्यानंतर इतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. पार्कच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली मात्र त्याला कुठेही मुलं सापडली नाहीत. यानंतर पोलीस आणि अग्निशन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून शोध सुरु आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या