दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत फळ-भाज्याकरीत बाजारपेठेचं ठिकाणं असलेल्या दादरमध्ये २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका ७५ वर्षीय महिलेला आणि ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे दादरमधील रुग्णांची संख्या २१वर गेली आहे. रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळं दादरकरांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दादरमध्ये नव्यानं कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण हे शिवाजी पार्क परिसरात राहणारे रहिवाशी आहेत. त्यामुळं शिवाजी पार्क परिसरात धोका अधिक वाढला असून, नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं घरात राहाणं बंधनकारक आहे. दादरमध्ये आतापर्यंत २१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

माहीमच्या प्रकाश नगरमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माहीममधील करोना रुग्णांची संख्या ७वर गेली आहे. दरम्यान दादर परिसर महापालिकेच्या जी उत्तर विभागात येत असल्यानं या विभागातील रुग्णांच्या संख्येतही हळूहळु वाढ होत आहे.

जी उत्तर विभागाला लागून असलेल्या जी दक्षिण विभागात आतापर्यंत ३०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये प्रभादेवी, वरळी परिसराचा समावेश आहे. कोरोनानं वरळीकरांना तर चांगलचं घेरलं आहे. त्यामुळं महापालिकेच्या या दोन विभागातील नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या