Coronavirus Updates: जे.जे. रुग्णालयात दोघांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जे.जे. रुग्णालयातील २ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. जे. जे. रुग्णालयातील डायलिसीस केंद्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं २ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळं हा विभाग बंद करण्यात आला असून लवकरच पूर्ववत सुरू केला जाणार आहे.

मूत्रपिंडाचा आजार असलेला ५६ वर्षीय रुग्ण १६ मार्चपासून जे.जे. रुग्णालयात उपचार घेत होता. १७ एप्रिलला त्याला रुग्णालयातून घरी सोडले. या काळात त्याच्यावर १४ वेळा डायलिसिस केले गेले. रुग्णालयातून सोडल्यावर काहीच दिवसांतच या रुग्णाला करोनाचा संसर्ग झाल्याचं समजतं. प्रतिबंधात्मक उपाय केंद्रात काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या. यातील एक वॉर्डबॉय आणि एक सफाई कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे २१ एप्रिलला आढळले.

डायलिसिस केंद्र बंद करून २४ एप्रिलपर्यंत निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. लवकरच हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान डोंगरी येथील हबीब रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह १४ कर्मचाऱ्यांना अलग ठेवले आहे. संबंधित स्त्रीरोग विभाग पालिकेने बंद केला.

पुढील बातमी
इतर बातम्या