मार्वे चौपाटीवर दोन मुले बुडाली, शोधकार्य सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या मालाड येथील मार्वे समुद्रात दोन मुले बुडाल्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण  कक्षाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरपर्यंत या दोघांचा अग्निशमन दलाचे जवान एफआरटी बोट च्या साहाय्याने शोध घेत होते. या घटनेची मालवणी पोलिसांना देण्यात आलेली आहे.

मालाड परिसरात राहणाऱ्या या दोन्ही मुलांचे ओळख पटली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. ही दोन्ही मुले मालाडच्या मालवणी परिसरात राहणारी असल्याचे कळते. यातील एका मुलाचे वय १६ असून दुसऱ्याचे वय १३ आहे. सायंकाळी ही मुले पाण्याचे बुडाल्याचे कळाल्यानंतर अग्निशमन दलाच्याजवानांनी एफआरटी बोटीच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र रात्री उशिरपर्यंत त्यांना मुलांचा शोध लागलेला नाही. अखेर अंधार झाल्याने शोध कार्यात व्यत्यय येऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य थांबवले. उद्या नेव्हीच्या मदतीने शोध कार्य पून्हा केले जाणार असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या