2000 रुपयांची नोट चलनातून बाद, तुमच्याकडे असेल तर हे काम करा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

2000 च्या नोटांबाबत  RBI ने महत्त्वाची घोषणा केली आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा RBI ने केली आहे. मात्र, सध्या बाजारात 2000 च्या नोटा चलनात राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता 2000 नोटांचे पुढे काय करावे हे जाणून घ्या. 

2000 रुपयांच्या नोटा असल्यास त्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहेत.

23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे. 


हेही वाचा

30 सप्टेंबरपर्यंतच 2000 च्या नोटा वापरता येणार

पुढील बातमी
इतर बातम्या