शॉटकर्ट बेतू शकतो जिवावर

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माहिम - पश्चिम मार्गावरील माहिम स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवासी त्याच प्लॅटफॉर्मवरील दुसऱ्या पुलाचा वापर करण्याऐवजी थेट शॉर्टकट म्हणून रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून माहिम पश्चिम रेल्वेच्या दोन नंबर फ्लॅटफॉर्मवरील प्रवासी पादचारी पुलाच्या जिन्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सुरू झाले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे फलक रेल्वे प्रशासनाकडून लावण्यात आले. पण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था दूर असल्याने प्रवाश्यांची एकच तारांबळ होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे.

सोमवारी रूळ ओलांडताना एका युवकाचा नाहक बळी गेला होता आणि चार अज्ञात युवक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. पर्यायी व्यवस्था केली असती तर रेल्वे रूळ ओलांडण्याची वेळ आली नसती, असे सिद्दीक शेख यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या