महापालिका शाळांचा लोकार्पण सोहळा

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शीव - पालिकेच्या एफ उत्तर विभागातील दोन शाळांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी झाला. हाजी इस्माईल हाजी अल्लाना महानगरपालिका शाळा आणि प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा या नवीन इमारतींचा हा लोकर्पण सोहळा होता. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या इमारतींचं लोकार्पण करण्यात आलं. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील उपस्थित होते.

अॅन्टॉपहील शेख मिस्त्री दर्गाजवळील हाजी इस्माईल हाजी अल्लाना शाळेची नव्याने पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये १२ वर्ग खोल्या, सभागृह, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय इत्यादी सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रतीक्षानगर महानगर पालिका शाळेत २० वर्ग खोल्या, सभागृह, संगणक तसंच विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय इत्यादी सुविधांचा येथे समावेश करण्यात आला आहे. अॅन्टॉपहीलच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि प्रतिक्षानगरच्या नगरसेविका प्रणिता वाघधरे यांच्या प्रयत्नाने या शाळांचं काम यशस्वी झालं. त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून शालेय मुलांना टॅबही देण्यात आले. 'मुलांचा आणि शाळेचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच नव्या कर्तबगार युवा पिढी घडू शकतात, असं मत आदित्य ठाकरे यांनी या वेळी मांडलं'.

पुढील बातमी
इतर बातम्या