युपीएससीत 'महाराष्ट्र' चमकला! मुंबईच्या प्रेमानंद दराडेचीही बाजी!

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • सिविक

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यात उस्मानाबाद येथील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. अनु कुमारी ही मुलींमध्ये पहिल्या क्रमांकावर असून टॉप १०० मध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान दुरूशेट्टी अनुदीप हा देशात पहिला आला आहे. एकूण १०५८ जागांचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्राने यावर्षी युपीएसीमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या परीक्षेत मुंबईच्या प्रेमानंद दराडेने (६५०) क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

राज्याची आकडेवारी शंभरीपार

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती. गेल्यावर्षी महाराष्ट्राची सुमारे ९० मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण वाढले असून हा अाकडा शंभराच्या घरात पोहोचला आहे.

महाराष्ट्रातून उत्तीर्ण विद्यार्थी

१) गिरीश बडोले (२०)

२) दिग्विजय बोडके (५४)

३) सुयश चव्हाण (५६)

४) भुवनेश पाटील (५९)

५) पियुष साळुंखे (६३)

६) रोहन जोशी (६७)

७) राहुल शिंदे (९५)

८) मयुर काटवटे (९६)

९) वैदेही खरे (९९)

१०) वल्लरी गायकवाड (१३१)

११) यतिश देशमुख (१५९)

१२) रोहन घुगे (२४९)

१३) श्रीनिवास पाटील (२७५)

१४) प्रतिक पाटील (३६६)

१५) विक्रांत मोरे (४३०)

१६) तेजस पवार (४३६)

देशभरातील टॉप १०

१) डुरीशेट्टी अनुदीप

२) अनु कुमारी

३) सचिन गुप्ता

४) अतुल प्रकाश

५) प्रथम कौशिक

६) कोया श्री हर्षा

७) आयुष सिन्हा

८) अनुभव सिंग

९) सौम्या शर्मा

१०) अभिषेक सुराणा

हा माझा युपीएससीसाठी पहिलाच अटेम्प्ट होता. मला भारतीय परराष्ट्र सेवेत(IFS) रुजू व्हायचं असून त्यासाठी यापेक्षा चांगल्या क्रमांकांची गरज असते. त्यामुळे मी पुन्हा ही परीक्षा देणार आहे.

प्रेमानंद दराडे, युपीएससी उत्तीर्ण (६५०)

पुढील बातमी
इतर बातम्या