वसईतील नागरिकांचा ट्रॅक्टरने प्रवास

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई-विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे (heavy rain) प्रमुख रस्त्यांवर दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे.

यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे . हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकले आहेत.

या कठीण परिस्थितीत उंचीने अधिक असलेले ट्रॅक्टर (tractor) आणि ट्रॉली प्रवाशांसाठी एकमेव मोठा सहारा ठरत आहेत.

चाकरमान्यांना ट्रॅक्टरचालकांनी परिसरानुसार गट तयार केले आहेत.

ते प्रत्येक प्रवाशाकडून केवळ 50 रुपये माफक भाडे घेऊन त्यांना वसई गाव, पूर्व भाग आणि गोखीवरेपर्यंत पोहोचवत आहेत.

वसई-विरार शहरात (vasai road) सलग पाचव्या दिवशी झालेल्या रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

शहरात गेल्या 24 ते 48 तासांपासून वीज नसल्यामुळे इमारतींमध्ये पाणी चढवता आले नाही, परिणामी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे मीरारोड ते वैतरणा कार्यक्षेत्र असलेले वसई रोड रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेले आहे.

पोलीस ठाण्यात कमरेभर पाणी साचल्याने येथील कामकाज पूर्णपणे बंद आहे. 

नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या