मी मुंबईसाठी काहीपण करेन, सोशल मीडियावर गाजतेय 'बीएमसी ताई'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत साथीच्या रोगांनी दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातच दुषित पाणी व अस्वच्छ असणाऱ्या परिसरात मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार पसरतात. त्यामुळं यातून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी महापालिका सध्या सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. त्यानुसार, 'मी मुंबईसाठी काहीपण करेन' म्हणणारी बीएमसी ताई सध्या सोशल मीडियावर गाजते आहे.

'बीएमसी ताई'

टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीत ही 'बीएमसी ताई' सध्या दिसते आहे. मलेरिया निर्मूलनासंबंधी पालिकेच्या प्रयत्नांबद्दल जनजागृती करताना ही 'बीएमसी ताई' दिसते आहे. घरोघरी जाऊन मुंबईच्या आरोग्याचा रेकॉर्ड ठेवणं तसंच, बीएमसीच्या फ्री हेल्थ स्कीम्सबद्दल नागरिकांपर्यंत माहिती पोहचवणाऱ्या ३२,००० मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं ती प्रतिनिधित्व करत असल्याचं या जाहिरातीत म्हटलं आहे.

योजनांचा लाभ

'मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा आणि फ्री आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा’, असं आवाहनही या व्हिडिओमधून करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिका @mybmc तसंच, आरोग्य विभागाच्या @mybmcHealthDept या ट्विटर अकाऊंटच्या सहाय्यानं सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय दिसते आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या