वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे मोडकळीस

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा -  प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे पोलीस नेहमीच सज्ज असतात. पण वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याची अवस्था पाहिल्यावर पोलिसांचीच सुरक्षाा धोक्यात आल्याचे चित्र दिसते. पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस आल्याने येथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. 

 1999 साली वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे फलाट क्रमांक 2 व 3 च्या मध्ये उभारण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत या पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. गळके छप्पर, तडे गेलेल्या भिंती, तुटलेल्या लाद्या, ढासाळलेले शौचालय अशा अवस्थेत येथील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. सध्या या पोलिस ठाण्यात 166 कर्मचारी कार्यरत असून त्यात 27 महिला पोलिस आहेत.

हे पोलीस ठाणे रेल्वे प्रशासनाच्यावतीने धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तशी नोटीसही येथे लावण्यात आलेले आहे. परंतु अद्याप कोणतीही पर्यायी जागा या पोलीस ठाण्याला उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. 

पुढील बातमी
इतर बातम्या