दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. शनिवार- रविवारी शहराच्या मुख्य भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलअभियंता विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

27 मे 2023 शनिवार ते 28 मे 2023, रविवार या दिवासंमध्ये शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मध्य मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीला कुठे गळती आहे का, हे शोधण्यासाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

याच कारणास्तव शनिवार आणि रविवारी दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल.  

गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कापड बाजार या भागात 27 मे शनिवारी संध्याकाळी 4 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

तर, धोबी घाट, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, या परिसरात दिनांक 28 मे रविवारी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. 

संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरातही पाणीपुरवठा प्रभावित राहणार असून, 27 मे, शनिवार दुपारी 2.30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 


पुढील बातमी
इतर बातम्या