कुर्ल्यातील 'या' भागात दोन दिवस पाणीकपात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुर्लामध्ये मंगळवार, 10 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, 11 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद किंवा कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील‘एल’ विभागातील कुर्ला परिसरात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद वा कपात करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व उपनगरांमधील ‘कुर्ला पश्चिम’ येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर एक्सप्रेस इन्  हॉटेलच्या समोर, साकीनाका येथे  झडपा बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दिनांक 10 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, दिनांक 11 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सदर कालावधीत ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तर काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. 

‘एल’ विभाग

  • जरीमरी
  • शांती नगर
  • तानाजी नगर
  • श्री कृष्णा नगर
  • सत्या नगर पाईप लाईन मार्ग
  • वृन्दावन खाडी नंबर 3
  • आशा कृष्णा इमारत
  • अन्नासागर इमारत
  • तिलक नगर
  • साईबाबा कंपाऊंड
  • डी सिल्वा बाग
  • एल. बी. एस. नगर
  • शेठीया नगर
  • सोनानी नगर
  • महात्मा फुले नगर
  • बरेली मस्जिद परिसर
  • शिवाजी नगर
  • अंधेरी कुर्ला मार्ग
  • अनिस कंपाऊंड
  • अंबिका नगर
  • सफेद पूल
  • उदय नगर

सकाळी 6 ते दुपारी 1 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक 10 मे 2022 रोजी पाणीपुरवठा सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत होईल आणि सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दिनांक 11 मे 2022 रोजी पाणीपुरवठा सकाळी 10 पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही आणि सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल

‘कुर्ला दक्षिण’

  • काजूपाडा
  • बैल बाजार
  • नवपाडा
  • एल. बी. एस. मार्ग
  • सुंदरबाग
  • ख्रिश्चन गांव
  • न्यू मिल मार्ग
  • हलाव पूल
  • मसरानी गल्ली
  • ब्राह्मण वाडी

सायंकाळी 6.30 ते सकाळी 8.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक 10 मे 2022 आणि दिनांक 11 मे 2022 रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल


पुढील बातमी
इतर बातम्या