नवी मुंबईतल्या 'या' भागात २ दिवसांसाठी पाणी पुरवठा खंडित

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईत ११ मार्च आणि १२ मार्च या दिवशी पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जल प्राधिकरण (MJP) द्वारे शुक्रवार, ११ मार्च, सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहर आणि विकास महामंडळ (सिडको) प्रशासित काही भागात पाणीपुरवठा होणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजता ते शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी ४ नंतर कमी दाबानं पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल.

सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे आणि करंजाडे नोडमध्ये शुक्रवारी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा खंडित होणार असल्याचं सिडकोनं कलं आहे. ही परिस्थिती शनिवार दुपार ४ वाजेपर्यंत राहणार आहे.

फीडरच्या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

या पार्श्वभूमीवर सिडकोनं वर नमूद केलेल्या नोड्समधील सर्व रहिवाशांनी याचा विचार करून पाणी साठण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरण्यास सांगितलं आहे.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या