अंधेरीत फुटली जलवाहिनी; लाखो लीटर पाणी वाया

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या अंधेरी येथील लिंक रोडवर पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. अंधेरीच्या सिटी मॉल परिसरात असलेल्या लिंक रोडवर ही पाण्याची पाईपलाईन फुटली. जलवाहिनी फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जात आहे. 

मंगळवारी सकाळच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याची माहिती समोर आली आहे. जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवाय, अंधेरी आणि जवळपासच्या भागातील पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम झाल्याचं समजतं.

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी दाखल झाले आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या