मान्सूनपूर्वी राज्यातील पाणीसाठ्यात घट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्याच्या घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  राज्यात (maharashtra) पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच धरणांतील (dam) मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28.09 टक्के पाणीसाठा (water storage) शिल्लक आहे. 

गतवर्षी याच दिवसाच्या तुलनेत 23.43 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. या अहवालानुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये 14,253.36 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उरला आहे. 

मात्र यंदा पाणीसाठा अधिक असला तरी केवळ 8,166.17 दशलक्ष घनमीटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपूर (nagpur) येथील धरणांमध्ये 1135.4 दलघमी, अमरावती येथे 901.41 दलघमी, छत्रपती संभाजीनगर येथे 1403.82 टक्के, नाशिक येथे 1169.56 दलघमी, पुण्यात 2678.32 दलघमी आणि कोकणातील धरणांत 877.66 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील सर्व मध्यम प्रकल्पाच्या धरणांमध्ये 38.98 टक्के, लघू प्रकल्पांच्या धरणांमध्ये 31.55 टक्के आणि महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये 29.94 टक्के पाणीसाठा आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची पाणी साठवण क्षमता ही 14 लाख 47 हजार 377 दशलक्ष लिटर आहे.

या तलावांतून दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या या धरणात 19.17 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा 13.63 टक्के होता.


हेही वाचा

नालासोपारा बेकायदेशीर बांधकाम प्रकरण : ईडीचे 13 ठिकाणी छापे

मेट्रो 9 विरार आणि वाढवन बंदरापर्यंत वाढवण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या