मुंबईतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (mumbai) शहरात 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह बदलण्याचं काम हाती घेण्यात आले आहे.

यामुले शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा (water supply) प्रभावित होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

हा पाणीपुरवठा शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल 22 तास खंडित राहणार आहे.

जुन्या आणि नवीन तानसा जलवाहिन्यांवरील (1200 मिमी) आणि विहार ट्रंक मेनवरील (800 मिमी) पाच व्हॉल्व्ह बदलले जाणार आहेत.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एन वॉर्डमध्ये 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.45 ते 8.00 वाजेपर्यंत राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार, राजावाडी रुग्णालय, ओएनजीसी कॉलनी, रेल्वे स्टाफ क्वार्टर्स, आर. एन. गांधी रोड येथे पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

एल वॉर्डमध्ये 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रोड, शिवश्रुष्टी रोड, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर रोड, एस. जी. बर्वे रोड कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस क्वार्टर्स, कासाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती रोड, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी गेट, म्हाडा कॉलनी प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी रोड, ताडवाडी, समर्थ नगर येथे पाणीपुरवठा खंडित होईल.

एम पश्चिम वॉर्डमध्ये 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत टिळक नगर, टिळक नगर स्टेशन रोड, पेस्टम सागर रोड (1-6), ठाकरे बप्पा वसाहत पाडा (1-4), शास्त्री नगर, वत्सलताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे रोड, पूर्व एक्सप्रेस वे, पश्चिम सर्व्हिस रोड (प्रगती सोसायटी), गोदरेज कॉलनी, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजिमेरा वसाहत, एमएमआरसीएएसआरए वसाहत येथे पाणीपुरवठा बाधित राहणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, एफ उत्तर वॉर्डमध्ये 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.45 ते 8.00 वाजेपर्यंत शिव (सायन) पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचे काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्ज (कफ परेड), शिव कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगरचे काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, भीमवाडी गेट 4 आणि 5 येथे पाणीपुरवठा खंडित होईल.

दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर (water cut) जपून करावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.


हेही वाचा

मीरा-भाईंदरमध्ये 48 ठिकाणी महिलांना आरक्षण

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

पुढील बातमी
इतर बातम्या