ठाणे, मुंब्रामध्ये शुक्रवारी पाणी नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
ठाणे, घोडबंदर आणि मुंब्रा परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे या ठिकाणी शुक्रवारी पाणी नसेल.  महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा, एमआयडीसी आणि मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचा पाणीपुरवठा केवळ १२ तासच बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

ठाणे महापालिका क्षेत्राला स्टेम प्राधिकरणाकडून रोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. शुक्रवार १२ जून रोजी सकाळी ९ ते शनिवार १३ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा, एमआयडीसी आणि मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचे नियोजन महापालिकेनं  केलं आहे.

त्यानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा व मुंब्रा या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार रात्री ९ ते शनिवार सकाळी ९ या वेळेत सिद्धेश्वर तलाव, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतुपार्क या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत ७९८ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी

'असे' आहेत मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन


पुढील बातमी
इतर बातम्या