मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील जुहू, विलेपार्ले, सांतक्रूझ, खार, अंधेरी या परिसरातील काही भागांत मंगळवार १३ जुलै रोजी पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र. ३ चे भाग क्र. २ चे वांद्रे आऊटलेट वर असलेल्या १२०० मिलिमीटर व्यासाची झडप बदलण्याचं काम मंगळवार १३ जुलैला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे. त्यामुळे एच पश्चिम (वांद्रे पश्चिम), के पूर्व व के पश्चिम (अंधेरी पूर्व-पश्चिम) या ३ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे किंवा पाणी कमी दाबानं होणार आहे.

के पश्चिम विभाग

  • गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. 
  • जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) –दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात सकाळी ८ ते ९.१५ वाजता या कालावधी दरम्यान कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.
  • चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते २.१० वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबानं राहील.
  • विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.५५ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

के पूर्व विभाग

  • विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबानं राहील.
  • सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबानं राहील.
  • मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८ ते १०.३० वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबानं राहील.

एच पश्चिम विभाग

  • खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात सकाळी ६.३० ते ९ या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या