ठाण्यात 'या' दिवशी पाणी कपात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

या कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवारी 12 मार्चपासून सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्चला सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कोणत्या भागात राहणार पाणीपुरवठा बंद?

या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे  महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ठाण्यात पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही पाणी कपातीची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे काही भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजा विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

पाण्याच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, त्या महापाकिलेनं तातडीनं सोडवाव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा

गारगाई धरण प्रकल्प निधीत 270 कोटींची वाढ

चिंबई समुद्रकिनारा स्वच्छता प्रकल्पाला बीएमसीची मंजुरी

पुढील बातमी
इतर बातम्या