भाजपा नगरसेवकांची पालिका अधिकाऱ्यांना धमकी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - दक्षिण मुंबईच्या गिरगाव, ठाकूरद्वार, कुंभारवाडा, सीपी टँक, चिराबाजार या सी वॉर्डमधील परिसरात पाणीटंचाईची संमस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावात आहे. या समस्येकडे अनेक वर्ष झाली तरी पालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार तिथल्या रहिवाशांनी केली आहे. तसेच नगरसेवक आणि सी विभागाचे अधिकारी या समस्येकडे कानाडोळा करताना दिसत असल्याचंही तिथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. महापालिकेतर्फे पहाटे पाच ते सकाळी सात या वेळेत पूर्वीप्रमाणे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक वेळा पाणी अशुद्ध येत असते. त्यामुळे सी वॉर्डच्या कामाकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा भाजपाचे नगरसेवक अतुल शाह यांनी सोमवारी दिला. तसेच सी वॉर्डचे अधिकारी घेगडमल जिवक यांना चागंलेच धारेवर धरले.

तसेच गिरगांवकरांना आणि कुंभारवाड्यातील नागरिंकाना पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यांनी या बाबतीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडेही दाद मागितली आहे. त्यानंतर वॉर्ड अधिकारी जीवक घेगडमल यांनी लवकरात लवकर गिरगाव, ठाकूरद्वार, कुंभारवाडा, सीपी टँक, चिराबाजार या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा देण्याचे प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. तर जोपर्यंत पुरेसे पाणी घराघरात पोहचत नाही तोपर्यंत या समस्येचा पाठपुरावा करणार असे प्रभाग क्रमांक 220 चे नगरसेवक अतुल शाहा यांनी सागितले.

पुढील बातमी
इतर बातम्या