तुंबलेल्या गटाराचा रहिवाशांना त्रास

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रतीक्षानगर - प्रतीक्षानगर मधील गटारे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे गटाराचं पाणी रस्त्यावर वाहू लागलं आहे. याचा त्रास इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील गटारात साचलेला कचरा साफ न केल्याने तुंबली गेली आहेत, असा येथील रहिवाश्यांचा दावा आहे. "प्रतीक्षानगर मधील गटारे तुंबणे ही समस्या आहे आणि त्यासाठी विभागात पर्जन्यवाहिनीचे काम लवकर केले जाणार असून ही समस्या देखील दूर होईल असं वॉर्ड क्र १६५ च्या नगरसेविका प्रणिता वाघधरे यांनी स्पष्ट केलं".

पुढील बातमी
इतर बातम्या