विजांच्या कडकडाटासह पावसाचा IMD चा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उकाड्यानं हैराण झालेल्या राज्यभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेनं पुढील ३ तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज देखील कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. परभणी शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, पाथरी, सेलू, तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

राज्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. शिवाय थंड वातावरण आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अर्ध्या तासाचा पाऊस झाला. या एका आठवड्यात तीनदा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या कामात मोठी मदत झालेली आहे. तापमान कमी झाल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात ही गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


हेही वाचा - 

पुढील बातमी
इतर बातम्या