Maharashtra weekend Lockdown : काय सुरू काय बंद? जाणून घ्या!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात कोरोनानं थैमान घातलं असून, या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, या लॉकडाऊन दरम्यान काय सुरू राहणार व काय नाही हे पुढील प्रमाणे

काय सुरू काय बंद?

  • शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन
  • लोकल ट्रेन सुरू राहणार
  • जिम बंद होणार
  • अत्यावश्यक सेवांना परवनगी 
  • रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
  • अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
  • रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
  • धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
  • सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
  • गार्डन, मैदाने बंद
  • जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
  • सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
  • रिक्षा- ड्रायव्हर + २ लोक 
  • बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
  •  टॅक्सीत मास्क घालावा
  •  कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
  •  मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
  • चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
  • बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
  • शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
  • प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
  • सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
  • २० लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी 
  • लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित 
  • विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
पुढील बातमी
इतर बातम्या