शाळेसमोरच कचरा संकलन

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मालवणी – मालवणीतील गेट क्रमांक सात येथील उत्कर्ष विदयालय शाळेसमोरच कचरा संकलन केले जात आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या शाळेसमोर दररोज लहान घंटागाड्यांमधून मोठ्या गाडीत कचरा संकलित केला जातो. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शाळेसमोरच डम्पिंग केंद्र बनवले आहे. त्यामुऴे शाळेच्या आवारात दुर्गंधी पसरत आहे.

"येथून कचरा गाडी हटवण्यासाठी आम्ही वांरवार तक्रार केली आहे, मात्र पी उत्तर पालिका विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात", असा आरोप शिक्षक फिरोज शेख यांनी केला आहे. याबाबत पालिका पी उत्तर पालिकेच्या घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रकाश गायकर यांना विचारले असता, "सदर जागेची पाहणी करून कचरा संकलित करण्याची जागा बदलण्यात येईल', असे आश्वासन त्यांनी दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या