बीकेसीचे मैदान कोण मारणार?

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या समारोपाची सभा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर घेण्याचे शिवसेनेने आधीच जाहीर केले आहे. मात्र, आता त्यांना याठिकाणी सभा घेण्यास परवानगीच मिळत नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव टाकून ही परवानगी देण्यास अडसर निर्माण करत असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेचे विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभा न होता आपली सभा होण्यासाठी भाजपाचा हट्ट असल्यामुळे बीकेसीतील हे मैदान कोण मारणार हेच पाहायचे आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शेवटची सभा कोण घेणार, यावरून दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या समारोपाची सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेनेने या मैदानावर सभा घेण्यास परवानगी मिळवण्यासाठी 12 जानेवारीला एमएमआरडीएला पत्र दिले आहे. परंतु अद्यापही एमएमआरडीएकडून याला परवानगी दिली गेलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दबाव येत असल्यामुळे एमएमआरडीएकडून परवानगी दिली जात नसल्याचा शिवसेना विभागप्रमुख अनिल देसाई यांचा आरोप आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची सभा ही बीकेसीच्या मैदानातच होणार आहे. परंतु जर सभेसाठी शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास भाजपाविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर या समारोपाच्या सभेत शिवसेनेचे मंत्री आपले राजीनामे देणार आहेत. त्यामुळे या भीतीने तसेच पराभवाच्या भीतीने बीकेसीतील मैदान शिवसेनेला 18 फेब्रुवारीला मिळू नये यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या