या फुटपाथला वाली कोण?

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

करी रोड - मुंबईसारख्या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होतोय. अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथवर जागा उरलेली नाही. करी रोडजवळील ना. म. जोशी मार्गावरील फुटपाथवर तोच अनुभव येतोय. या बेकायदा पार्किंगमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. इथे दुचाकी वाहनं नेहमीच उभी करून ठेवलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला जागाच उरत नाही. त्यात फेरीवालेही भर घालतात. मात्र वाहतूक पोलीस अधिकारी या बेकायदा पार्किंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असं स्थानिक रहिवासी साहिल चांदे यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या