रस्ते घोटाळ्यातील बडे मासे अद्याप मोकाट

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - शहरातील रस्ते घोटाऴ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्या 26 जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. पण या घोटाळ्यातील बडे मासे अजूनही मोकाट आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीकडून उर्वरित 207 रस्त्यांच्या कामाचा चौकशी अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिका वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

रस्त्यांच्या कामांतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेण्यात आली आहे. या समितीच्या चौकशीत 34 रस्त्यांच्या सुमार कामाप्रकरणी 26 जण दोषी आढळले असून, त्यांना अटकही झाली. उर्वरित 207 रस्त्यांच्या कामांच्या चौकशीत अनेक बडे कंत्राटदार आणि अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं सर्वांचंच लक्ष या अहवालाकडे लागले आहे. पण प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात चालढकल होत आहे.

पालिका निवडणुकीत नालेसफाई, रस्ते घोटाळे आणि खड्डे हेच प्रचाराचे मुद्दे असतील. त्यामुळं आचारसंहिता लागू होण्याआधीच अहवाल सादर करून शिवसेनेला दणका देण्याच्या तयारीत भाजप असल्यामुळे अहवाल सादर होण्यास विलंब होत नाही ना, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.

पुढील बातमी
इतर बातम्या