पोलिसांच्या गस्त वाहनांवर आता माहिला पोलीस चालक!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महिलांच्या सुरेक्षेसाठी पोलीस ताफ्यात रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या वाहनातील चालक महिला पोलीस असणार आहेत. त्यासाठी महिला पोलिसांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. महिला चालक पदाकरता अंतर्गत सूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार सशस्त्र विभागातील चार पोलीस महिलांनी अर्ज केला होता. नागपाडा मोटर परिवहन विभाग सध्या चार महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. या महिलांनी दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पा पार केला आहे. लवकरच या महिला गस्ती वाहनांवर चालक म्हणून दिसणार आहेत.

मुंबईतील 92 पोलीस ठाण्यांकरता गस्त वाहने दिलेली होती. या वाहनांत जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्या पोलिसांसोबत एक महिला पोलीस शिपाईही तैनात करण्यात आले होते. पण चालक महिलांची संख्या अपुरी पडत असल्याने पुरुष पोलिसांना वाहने चालवावी लागत होती. पण ते चित्र आता बदलणार असून महिला पोलीस गस्त वाहन चालक असणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या