महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी पुढाकार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावी - धारावीतील संत रोहिदास मार्गावर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शिवजयंती महोत्सवाची सांगता यंदा एका अनोख्या उपक्रमाद्वारे रविवारी रात्री करण्यात आली. धारावी विधानसभा क्षेत्र आणि उपविभाग प्रमुख मुत्तू तेवर यांच्या वतीने 600 गरीब आणि गरजू महिलांना साड्या आणि 100 महिलांना शिलाई यंत्र देऊन स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, उपविभागप्रमुख मुत्तू तेवर, प्रकाश आचरेकर, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, नवनिर्वाचित नगरसेवक मारियम्माल मुत्तु तेवर, वसंत नकाशे, टी. एम. जगदीश, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, जोसेफ कोळी, राजू कांबळे. उपस्थित होते.

वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे. महागाईमुळे एकट्याच्या जीवावर संसाराचा गाडा हाकणे मोठ्या कष्ठाचे होऊन बसले असताना धारावीतील 100 महिलांना स्वावलंबी तसेच सक्षम बनविण्यासाठी शिलाई यंत्र देण्यात आले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरीब गृहणीच्या संसाराला काहीतरी हातभार लागेल हा मुख्य उद्धेश आयोजकांचा होता. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या उपक्रमाची पोच पावती म्हणून यंदा धारावीत शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मी प्रथम हा उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांचे तसेच धारावीकरांचे आभार मानतो, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर. तसंच धारावीकरांच्या नागरी प्रश्नांना प्राधान्य देणार आहे, त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना पालिकेच्या जेंडर बजेटचा वापर करून विभागातील जास्तीत जास्त महिलांना स्वावलंबी तसंच सक्षम कसे करता येईल याकडे लक्ष देणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या