कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, KEM रुग्णालयात काम बंद आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ येथील के.ई.एम रुग्णालयातील कोरोनाच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं. त्यामुळं केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे. सकाळी ९.३० वाजल्यापासून हे आंदोलन करण्यात आले आहे. 

कोविड रुग्णांचे मृतदेह ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा पीपीई किट्स पुरवले गेले नाहीत असा आरोप करत आतापर्यंत ७ शवागृहात काम करणारे कर्मचारी ही पॉझिटिव्ह आल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय, मृतदेहही तसेच पडून राहत आहेत. नातेवाईकही मृतदेह ताब्यात घ्यायला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत सतत त्याच मृतदेहांमध्ये काम करावं लागतं. 

अनेक नातेवाईक शवगृहाबाहेर फिरत राहतात. त्यातून संसर्ग पसरण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीवर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या