वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर माहिती दिली की, मुंबईतील वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशन जवळ सुंदर कलाकृती उभारली आहे. दोन दिवसांपासून ही सुंदर कलाकृती नागरिकांना पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये भिंत हृदय आणि फुलपाखरांच्या सुंदर कलाकृतींनी सजलेली पाहायला मिळत आहे.

यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं की, शहरातील पायाभूत संस्था, मुख्य मार्ग, रस्त्यांचे नूतनीकरण हाती घेण्यात येईल. जेथे शक्य असेल तिथे सायकलिंग ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला (डब्ल्यूईएच) लवकरच सायकल ट्रॅक मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४.५ कि.मी. शिवडी-वरळी कनेक्टरचे भूमिपूजन केले. वांद्रे-कुर्ला संकुलात सायकल ट्रॅक तसंच स्मार्ट पार्किंगचे उद्घाटन केले.

दरम्यान, हाजी अली किनारपट्टीवरील प्रकल्पामुळे मच्छिमार चिंतेत आहेत. हाजी अली दर्गा मुंबईच्या दक्षिणेकडील भागातील वरळीच्या किनाऱ्याजवळील एक दर्गा आहे. प्रकल्पासाठी गेल्या काही आठवड्यांत मच्छिमारांना त्यांच्या बोटी सोडून जागा रिक्त करण्यास सांगण्यात आलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या