पश्चिम रेल्वेची 28 ते 29 जून रोजी रात्री ब्लॉकची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, वसई रोड (vasai road) आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शुक्रवार/शनिवारच्या रात्री म्हणजे 28 ते 29 जून 2025 रोजी अप आणि डाउन फास्ट मार्गांवर तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.

पश्चिम रेल्वेचे (western railway) मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, अप फास्ट मार्गावर 23.50 वाजल्यापासून ते 2.50 वाजेपर्यंत ब्लॉक (mega block) घेण्यात येईल, तर डाउन फास्ट मार्गावर 01.30 वाजल्यापासून ते 04.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉकमुळे 19101 विरार-भरूच मेमू ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावेल आणि त्यामुळे विरारहून 04.35 वाजता निघणाऱ्या नियोजित वेळेऐवजी 04.50 वाजता निघेल.

त्यामुळे, या रविवारी, 29 जून 2025 रोजी पश्चिम रेल्वेच्या (WR) उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक राहणार नाही.

यासंदर्भातील सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टरच्या कार्यालयात उपलब्ध आहे.


हेही वाचा

5 जुलैच्या मोर्च्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार: संजय राऊत

मुंबई, ठाण्यात नवीन राइड-हेलिंग अॅप लाँच होणार

पुढील बातमी
इतर बातम्या