महाराष्ट्रात ३ मे पासून ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपण कुठंही गेलो तरी आपल्यासोबत कायम सावली ही असते. आपला पाठलाग करते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आता चक्क शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. येत्या मे महिन्यात राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या ३ मे पासून ३१ मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळं सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात येत्या ३ मे पासून ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येत आहेत. तर मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी १५ मे पासून २८ जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. प्रत्येक शहरासाठी विविध दिवशी आणि वेळी शून्य सावली अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

विदर्भात १५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शून्य सावली अनुभवता येईल. त्यानंतर १७ मे रोजी अहेरी, आल्लापल्ली, १८ मे मुलचेरा, १९ मे पुसद, बल्लारशा, चामोर्शी, २० मे चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, २१ मे चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, २२ मे बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, २३ मे खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड, २४ मे शेगाव, वर्धा, उमरेड,द-र्यापूर, २५ मे अमरावती, तेल्हारा, २६ मे नागपूर, भंडारा, परतवाडा, २७ मे परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, २८ मे वरुड,नरखेड येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे.

तुम्हाही या क्षणाचे साक्षिदार होऊ शकता. यासाठी तुम्हाला https://alokm.com/zsd.html या लिंकवर क्लिक करुनही शून्य सावली दिवसाबाबत माहिती करुन घेऊ शकता.

सावली गायब होणं म्हणजे काय?

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. २३ डिसेंबर ते २१ जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. २ असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज ५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळे दिवस आणि वेळा असतात. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी १२ ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. जेणेकरुन तुम्हाला शून्य सावली दिसू शकते.

पुढील बातमी
इतर बातम्या