दहिसरमधील भाजी मंडईचं उद्घाटन

दहिसर - महानगरपालिकेने बांधलेल्या भाजी मंडईचं उद् घाटन शनिवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्रातील हे पहिलं भाजी मार्केट आहे ज्यात थेट शेतकरी आपली भाजी रोज विकू शकणार आहेत. यापूर्वी आठवडा बाजाराच्या माध्यमातून शेतकरी फुटपाथ आणि मोकळ्या जागेत भाजी विकत होते. या मंडईमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार मिळाला आहे.

दहिसरमधील कायमस्वरूपी भाजी मंडई अर्थात अशोकवनच्या मनपा इमारतीमध्ये होणाऱ्या या बाजाराचं उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं.
या खुल्या भाजी मंडईमुळे दहिसरकरांना नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिलीय. याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, तेही तितकंच खरं. तुम्हालाही स्वस्त आणि मस्त भाजी घ्यायची असेल तर नक्की या भाजी मंडईत जा.

पुढील बातमी
इतर बातम्या