मुंबईत भासणार दुधाचा तुटवडा

मुंबई - केंद्र शासनाने 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर आणलेल्या बंदीचा फटका दूध विक्रेत्यांना देखील बसलाय. ग्राहकांकडून दूध विक्रेत्यांकडे आलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा महानंद, गोकूळ आणि अमूल डेअरीधारक स्वीकारत नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांकडे नोटांचा खच पडून आहे. मुंबईत दररोज 4 लाख पिशवीबंद दुधाचे वितरण होते. पैसे नसल्यामुळे दूध घेता येणार नसून मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार आहे.

ग्राहकांकडून पाचशे हजारांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यास ते माध्यमातील बातमी दाखवतात. अत्यावश्यक सेवेमुळे त्या जुन्या नोट्या नाईलाजानं स्वीकाराव्या लागत आहे. त्यामुळे डेअरींनी पाचशे हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी डेअरी मालकांना मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी मुंबई दूध विक्रेता संघाचे सचिव जगदीश कट्टीमणी यांनी केली आहे.

महानंद, आरे सहकारी डेअऱ्या जुन्या नोटा आणि चेकने पैसे घेतील. याबाबत या डेअरींच्या संचालकांशी नोटा आणि चेक स्वीकारण्याबाबत बोलणार असल्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या